Jun 17

२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य

20.Guru :: Maiden

कोण्या एका कुमारिकेला घरात राखण करायला ठेऊन तिचे आई-वडील कुलस्वामिनीच्या यात्रेला जातात. त्यावेळी अचानक त्या कुमारिकेचा विवाह ज्या घरात ठरला आहे त्या घरातली मंडळी घरी येतात. घरात कोणी नाही परंतु त्यांचा आदरसत्कार करायला हवा ह्या विचारात ती कुमारिका काहीही न बोलता त्यांच्या आदर सत्काराच्या तयारीला लागते.  घरामध्ये तांदूळ सडलेले नाहीत हे पाहून कुमारिका लगेच तांदूळ सडू लागते परंतु तिच्या कंकणाचा आवाज होऊ लागते. पूर्वीच्या काळी रिवाज असे कि स्त्रियांच्या ककणांचा आवाज होणे बरे नाही, त्यावरून त्या मुलीची अथवा स्त्रीची स्वभाव परीक्षा होत असेल. तेव्हा आपल्या ककणांचा आवाज झाला तर वर पक्षाला वाटेल कि मुलगी दांगट आहे म्हणून त्या कुमारीकेनी आपल्या हातामाध्ले दोन कंकण काढून ठेवले आणि पुन्हा तांदूळ सडू लागली पण तरीहि आवाज होताच होता. त्या कुमारिकेने हातामध्ये एक-एक कंकण ठेऊन आपले काम सुरु केले. ह्यावरून योगी पुरुषाने असे लक्षात घ्यावे कि अनेकजण जिथे एकत्र होतात तिथे कोलाहल होतो आणि दोन जणांमध्ये संवाद. कोणताही गट बनवून राहण्यापेक्षा योगी पुरुषाने साधनेसाठी एकाकीपणा आचरावा.

श्री गुरुदेव दत्त...!!!

 

Date: 17 Jun 2012

Start Jap Online