Jun 16

दत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध (भाग २)

:: कथा ययातिची  ::

 

पांडवांचा पूर्वज राजा नहूषाचा पुत्र 'ययाति'. एक असा राजा ज्याने भौतिक सुखासाठी बरेच काही गमावले. सर्व काही असून ययातिच्या वाटेला आत्मिक सुख आले नाही.

 

24 Gurus

ब्राम्हणकन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्व ह्याची कन्या शर्मिष्ठा ह्या दोघीही सोबतच लहानाच्या मोठ्या झाल्या. शर्मिष्ठाला तिच्या राजकन्या होण्याचा गर्व आणि देवयानीला दैत्यांच्या गुरुकन्या असण्याचा गर्व. दोघीही सोबत जरी वाढल्या असल्या तरी दोघींचा अहं तसाच शाबूत होता. दोघीही एकमेकींना कमीपणा दखवायची संधी सोडत नसे. एक दिवशी जलक्रीडा करत असताना देवयानी आणि शर्मिष्ठा ह्या दोघींचे भांडण झाले. अश्यात देवयानीचा पाय घसरला आणि ती विहिरीमध्ये पडली. ते पाहून शर्मिष्ठापण घाबरली आणि वेगे घरी गेली परंतु देवयानीचा समज झाला कि शर्मिष्ठा तिला ढकलून घरी निघून गेली. योगायोगाने ययाति त्या विहिरीजवळून जात होता आणि त्याने देवयानीचा आवाज ऐकला आणि त्यानी तिचे प्राण वाचवले. आपले अर्धे वस्त्र देवयानीस दिले. देवयानीने तिथेच त्याचा पती म्हणून स्वीकार केला होता. कारण एका परपुरुषानि तिचा जीव तर वाचवलाच होता परंतु तिला वस्त्र देऊन तिच्या शीलाचे रक्षण केले होते. ययातिहि ह्या लग्नाला तयार झाला. त्याप्रमाणे ययाति आणि देवयानी यांचा विवाह झाला. परंतु देवयानी शर्मिष्ठाला विसरली नव्हती. शुक्राचार्यांच्या कोपातून वाचण्याकरिता आणि राज्याकरिता शर्मिष्ठाला राजकन्या असून आजन्म देवयानीचे दासित्व पत्करावे लागले.

 

24 Gurus

पुढे खूप काळ लोटला. देवयानीला आणि ययातिला यदु, तुर्वासू हे दोन पुत्र झाले. दरम्यान राजकन्येची दासी झालेली शर्मिष्ठा आणि ययाति हे देखील एकमेकांच्या जवळ आले होते. परंतु दासी असल्या कारणानी तिच्याशी विवाह करणे ययातिस अशक्य होते. परंतु पुढे शर्मिष्ठाला आणि ययातिला दृहयु, अनु आणि पुरू असे तिघा पुत्र झाले. शर्मिष्ठाने ययातिला एकांतामध्ये तिचे पत्नीत्व जाहीर करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला आणि ययातिने ते मान्य केले. हे ऐकून देवयानी संतापली आणि आपल्या वडिलांच्या कानावर हि हकीकत घालताच शुक्राचार्य कोपले आणि ययातिला शाप दिला, 'भोगवासेनेच्या आहारी जाऊन तू दासीचा स्वीकार केलास, तुला भौतिक सुखात अधिक रस होता. पण हे सगळ तू केलास ते तुझ्या यौवनाच्या जोरावर. मग मी तुला शाप देतो, तुझे यौवन लुप्त होऊन तू तत्काळ वार्धक्य प्राप्त करशील.' मात्र हा शाप ऐकून देवयानीच्या पायाखालची जमील हलली. आपल्याच वडिलांनी आपल्याच पतीला असा शाप दिला तेव्हा तिने पुन्हा शुक्राचार्यांना याचना केली कि ह्यासाठी काहीतरी उःशाप द्यावा. तेव्हा शुक्राचार्यांनी सांगितले ह्या शापाला एकाच उःशाप, ययातिचे तारुण्य त्याला परत मिळवायचे असेल तर त्याने एका अश्या तरुणाला याचना करावी जो त्याचे तारुण्य ययातिला देऊन ययातिचे वार्धक्य पत्करेल परंतु तो तरुण ययातिच्या रक्ताचा असावा. जगण्याची, भोगाची, वासनेची लालसा ययातिला इतकी होती कि त्यानी आपल्या पाचही पुत्रांना त्यांच्या यौवनाची याचना केली. आपल्या पुत्रांच्या जिवापेक्षा स्वतःच्या शारीरिक सुखाची भूक मोठी वाटली. त्यात दासी शर्मिष्ठाचा लहान पुत्र पुरू वडिलांच्यासाठी हा शाप स्वतः पत्करायला तयार झाला. पुरुवर प्रसन्न होऊन ययातिनी त्याला सिहासनाधीश बनवले आणि यदु आणि इतर चार पुत्रांना शाप दिला, ' तुम्हाला किंवा तुमच्या वंशजांना छत्र आणि सिंहासन प्राप्त होणार नाही.' हे ऐकून यदु अतिशय कष्टी झाला. आणि मनात अनेक प्रश्न, शंकांचे पोळे घेऊन यदु जंगलात निघून गेला.

श्री गुरुदेव दत्त...!!!

Date: 16 Jun 2012

Start Jap Online