Jun 17

१६. मासा :: ओढ, आसक्ती

16.Guru :: Fish

मासा पाण्यात राहणारा एक जीव. परंतु त्या माश्याला पाण्याची इतकी ओढ, इतकी आस असते कि तो पाण्यावाचून एक क्षण जिवंत राहू शकत नाही. त्याची पाण्याशी असलेली आसक्ती, ओढ हि परमोच्च असते. माश्याला पाण्याहून विलग करता येत नाही. त्याप्रमाणे भगवंताविषयी योगी पुरुषाला तितकीच ओढ असावी. भगवंताच्या नामस्मरणाने योग्याचे प्रत्येक क्षण व्यातीती व्हावेत. भगवंत आणि भक्त एकरूप झाले पाहिजेत कि भगवंतापासून भक्ताला विलग करणे म्हणजे शरीरापासून आत्म्याला विलग करणे.

माश्याचा अजून एक गुणधर्म म्हणजे रसनेची तृप्ती होण्यासाठी गळाला अडकवलेले अन्न मासा ग्रहण करायला जातो आणि आपला मृत्यू ओढवून घेतो त्याप्रमाणे योग्याने त्याच्या जिव्हेच्या स्वादास अति महत्व देणे व्यर्थ आहे.योग्याने परमात्म्यावर विश्वास ठेऊन मिळालेली भिक्षाच संपूर्ण मानवी.

श्री गुरुदेव दत्त...!!!

Date: 17 Jun 2012

Start Jap Online