गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

नमस्कार,

आपले ह्या अर्पण website वर मनःपूर्वक स्वागत.

'अर्पण' हि webSite आम्ही एक अर्पणांजली म्हणून अर्पण करत आहोत, खास अश्या लोकांना, भक्तांना आणि सर्वांना ज्यांनी आजही, कलियुगात देखील आपली भक्ती आणि देवावरची श्रद्धा दृढ ठेवली आहे, आपल्या अमूल्य संस्कृतीचे जतन करत आहेत आणि हा परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

५ मे २०११ रोजी Facebook द्वारा सुरु केलेला एक उपक्रम, एक मंच Shri Dattaguru (श्री दत्तगुरू). एक सामान्य दत्तउपासक ह्या नात्याने श्री गुरुकृपेचे महत्व आणि त्या गुरूंची सेवा कार्यरत ठेवण्यासाठी सुरु झालेला छोटासा प्रवास. त्या प्रवासात अनेक प्रवाह येऊन त्या Page शी एकरूप झाले आणि श्रीगुरु कृपेनी आज त्या Page ला एक पवित्र नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु त्या पवित्र नदीला प्रवाहित होऊन सर्वांपर्येंत पोहोचण्यासाठी Facebook चे पात्र कमी पडत आहे. त्यासाठीच अर्पण चे प्रयोजन होत आहे.

एखाद्या भक्ताने मंदिरात जावे व आपल्या इष्ट देवतेचे दर्शन घ्यावे आणि आपली आत्मिक - अध्यात्मिक वृद्धी करावी त्याचप्रमाणे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आणि Internet युगात आपल्या सारख्या भाविकांना त्यांची श्रद्धा, भक्ती अर्पण करता यावी ह्या उद्देशाने आज अर्पण चा जन्म झाला आहे. अर्पण हा मंच वैश्विक शक्ती, ईश्वर, ईश्वरिक अवतार, संत, भक्त अश्या सर्वांना समर्पित आहे.

अर्पणद्वारे श्री दत्तगुरुरायांच्या चरणी सर्व दत्त भक्तांना एकत्र आणण्याचा हा एक प्रयास आहे. बाकी साक्षी श्री गुरु आहेतच..!!

ह्या website च्या माध्यमातून नवनवीन माहिती सर्वांपर्येंत पोहोचवण्याचा मानस आहे. ह्या website वरील सर्व मजकूर हा स्वअभ्यासित आणि स्वलिखित स्वरूपाचा आहे त्यामुळे website ला Credit देऊन त्यावरील मजकूर Share करू शकता परंतु त्याचे कोणत्याही प्रकारचे पुनर्मुद्रण (Print, Digital, Audio, Video) पूर्व परवानगी शिवाय करता येणार नाही, त्यासाठी Feedback देऊन Site Adminशी संपर्क साधावा.

ह्या मंचावर आपला सहभाग मोलाचा ठरेल. आपण आपली प्रतिक्रिया आणि आपल्याला असलेली माहिती इथे जरूर Share करू शकता.


श्री गुरुदेव दत्त...!!

Start Jap Online