Nov 22
दत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे ||धृ||
अनसूयेचे सत्व आगळे
तिन्ही देवही झाली बाळे
त्रैमूर्ती अवतार मनोहर
दीनोद्धारक त्रिभुवनीं गाजे ||१||
तीन शिरे कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरीं पायीं खडावा
भस्म विलेपित कांती साजे ||२||
पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आंसू झरती
सारे सात्विक भाव उमलती
हळूहळू सरते मीपण माझे ||३||
- कवी :: सुधांशु
श्री गुरुदेव दत्त ...!!!