May 23
Shri Dattamahatmya (श्री दत्तमाहात्म्य )
अत्री-अनसूयानंदन भगवान दत्तात्रेय म्हणजे गुरु परंपरेचे मूळपीठ ! कृपेचा अक्षय स्त्रोत आणि त्रिदेवांचे विश्वव्यापी स्वरूप म्हणजे श्री गुरुदेवदत्त. त्यांचा अचिंत्य पुण्याभाव संपूर्ण विश्वव्यापी आहे. शुद्ध भक्तीला शिग्र प्रसन्न होणारी माउली आहे. त्यांच्या भक्तिने चारही पुरुषार्थ सिद्ध होतात. श्री गुरुदत्तात्रेय म्हणजे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्ताच्या कल्याणाची सर्व सूत्र स्वयं हाती घेऊन भक्तांच्या पाठीशी सदैव खंबीर उभे असतात. गुरुरायांच्या नामस्मरणाने अतःकारण शुद्ध होते. दैन्य,क्लेश,भीती,चिंता ह्याचे हरण होऊन निर्मल भक्ती आणि विचारांचा प्रवेश अंतर्मनात होतो. ह्याचा अनुभाव अनेक दत्तभक्त आज घेत आहेत तोच अनुभाव तुम्हा सर्वांना पर्येंत पोहोचवा आणि श्री गुरुरायांची कृपादृष्टी सदैव सर्वांना लाभावी हीच छोटीशी गुरुचरणी भेट ...!!
श्री गुरुदेव दत्त...!!!