Sep 06

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौदावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"

 

तो सायन्देव म्हणे । म्लेच्छराजा माझें जिणें । हरील वाटे आजी त्याणें । बोलावणें केलें आहे॥१॥
मीं अतःपर न डरें। गुरु म्हणती तूं जा त्वरें । परतवील तो सत्कारें । म्हणूनी करें आश्वासिती ॥२॥
हाची प्रसाद म्हणून । सायंदेव जातां यवन । मृतप्राय हो भिवून । गौरवूत त्या बोळवी ॥३॥
वंशवृद्धी निजभक्ती । गुरु देवून पुनः भेटी । सायंदेवा देवूं म्हणती । गुप्त होती पुढें स्वयें ॥४॥
निवृत्तिः श्रीगुरुपदैः । सर्वत्रात्र प्रकाशिता । प्रस्थाप्य तीर्थयात्रायै । स्वन्गृहीताऽप्रकाशिता ॥५॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Date: 06 Sep 2012

Start Jap Online