Sep 20
सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा
श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"
तो कुमसीग्रामीं वसे । तेथससैन्य गुरु येतसे । त्रिविक्रमा ध्यानीं दिसें । देव येतसे नदीतीरीं ॥१॥
तेथें पळत ये यती । तया दिसे सैन्य यती । गुरु त्याचा गर्व हरती । त्या दाविती निजरुप ॥२॥
तो कर जोडुनी प्रार्थी । गुरु तया गती देती । गाणगापुरी मागुती । गुरु येती सैन्यासह ॥३॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे विश्वरुपदर्शन नाम चतुर्विंशोऽध्यायः
श्री गुरुदेव दत्त...!!!