Nov 29

श्री दत्ताचें नाम मुखीं - कवी :: गिरीबाल

श्री दत्ताचें नाम मुखीं या माझ्या रात्रंदिनी
गेलो दत्तमयी होऊनी  ||धृ||

 

 

 

 किती महिमा गावा गावा
चित्त आळवी एकच नावा
त्या नावांतील सामर्थ्याने गेलों मी मोहुनी ||१||

 

 ब्रम्हा विष्णू महेश यांचे
रूप त्रिमूर्ती एकच साचे
हृदयमंदिरी प्रतिष्ठापना झालेली पाहूनि ||२||

 

चरण दोन हे मार्ग दावती दावती
सहा करे सामर्थ्य अर्पिती
ईशकृपेहून काय मागणे मागावे मागुनी ||३||

 


- कवी :: गिरीबाल

 श्री गुरुदेव दत्त ...!!!

 

 

 

Date: 29 Nov 2012

Start Jap Online