May 24
Ovi Shri Gururayanchi (ओवी श्री गुरुरायांची)
पहिली ओवी गायीली चौर्याऐंशी
माझं मन सदा दत्तगुरूंच्या चरणापाशी...... (ओवी)
अर्थ: वरील ओवी हि श्री दत्तगुरूंच्या भक्तीस समर्पून आहे.चौर्याऐंशी लक्ष योनीतून फेरा घेतल्या नंतर आपल्याला हा मानवाचा जन्म लाभतो. परंतु श्री गुरुदेव दत्तांच्या नामस्मरणाने आणि आपलं मन त्यांच्या भक्तीत लीन करून मनोभावे चरणी मेळालेला आश्रय भक्ताला ह्या चौर्याऐंशींच्या लक्ष योनी प्रवासाच्या चक्रातून मुक्त करतो.आत्म्याला मुक्तीचा मार्ग सापडतो.म्हणून माझा पहिला ओवी रुपी नमस्कार गुरुरायांच्या चरणी.
श्री गुरुदेव दत्त...!!!