Jul 27

श्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम

हिंदू पंचांगानुसार श्रावण हा पाचवा महिना आहे. श्रावणमास म्हणजेच सण, व्रत- वैकल्य करून पुण्य अर्जित करण्याचा उत्तम कालावधी. अश्या ह्या अतिशय पावन आणि पवित्र महिन्यात नामस्मरण करावे. श्रावण महिन्यात शिव आराधना अतिशय फलदायी ठरते.

 

samudra manthan: shiv taking halahalश्रावण महिन्याचे विशेष महत्व आहे. हा वर्षाकाल आहे, ह्याच श्रावण महिन्याला पौराणिक महत्व प्राप्त झाला आहे. देव आणि दानवांतील समुद्र मंथनातून निघालेले हलाहल (विष) स्वतः प्राशन करून भगवान शिवांनी संपूर्ण सृष्टीला नवजीवन दिलं. हे हलाहल कंठात स्थित केल्याने भगवान शिव चे नीलकंठ हे नाव प्रचलित झाले. श्रावणातील सोमवारी ह्या नीलकंठ सोमेश्वरची आराधना केल्यास जन्मोजन्मीचे पुण्य प्राप्त होते.

 

अर्पण मंच ह्या पवित्र श्रावण महिन्यात घेऊन आला आहे "जपनाम". ह्या सदरात आपल्याला दर गुरुवारी वाचता येतील  जपनामाविषयी विविध लेख सोबत दररोज आपल्याला वाचायला मिळेल एक पवित्र मंत्र आणि सोबत त्याची फलश्रुती (फायदे). तसेच ह्या मंत्राचा आपण ऑनलाईन जप करु शकता http://japnaam.myarpan.in/ ह्या संकेतस्थळी.

 

तेव्हा श्री गणेशा करूया अर्पण मंचाच्या श्रावणातील सातव्या पुष्पाचा "जपनाम" ...!!

 

Related Articles :

श्री गुरुदेव दत्त..!!    

Date: 27 Jul 2014

Start Jap Online