Jun 10
दत्तरूप महती ( Datta Roop )
ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर ह्यांचे सगुण साकार रूप म्हणजे श्री गुरुदेव दत्त..! ह्या त्रिदेवांच्या एकत्रित रूपचे सामर्थ्य भक्ताला ठाई ठाई अनुभवला येते.
तीन मुख, सहा हात, दोन पाय, पुढे चार श्वान व जवळ कामधेनु (गोमाता). हातामध्ये डमरू, त्रिशूल, शंख, चक्र, माळ, कमंडलू आणि खांद्यावर झोळी. गुरुरायांच्या ह्या रूपातून भक्ताला त्यांच्या गुरुरूप, भक्तवत्सल, भक्ताभिमानी आणि कृपाळूतेची महती पटते. अनन्य भक्तीभाव हृदयात जागृत ठेवणारी हि गुरुरूपी ज्योत सदैव भक्ताच्या ठाई जागृत राहते. हि अवधूतचिंतन मूर्ती डोळ्यांत भक्तीभाव, प्रेम, माया ठेऊन जाते.दिशाहिनांना दिशा मिळते, पीडितांच्या पीडांचे शीघ्र पतन होते. अश्या त्या शांत, प्रसन्न, तेजाकार गुरुस्वरूपा बदल थोडेसे....
- त्रिमुख : एक मुख उजवी कडे, एक डावी कडे आणि एक समोर बघणारं आहे. ब्रम्हरूपी मुख डावीकडे बघणारं, आपल्या भूतकाळावर तटस्थ पणे समीक्षा करणारं शिव स्वरूपउजवी कडील मुख, आपल्या भविष्यकाळात पाहणार आणि आपल्या वर्तमानिशी एकरूप झालेला विष्णू स्वरूप मुख समोर बघणारं. ह्याचा असा पण अर्थ होतो हिंदू धर्मात ब्रम्हानी, विष्णूच्या आधिपत्याखाली सृष्टीची रचना केली, ह्या संपूर्ण विश्वाला आकार दिला आणि सृष्टीत सौंदर्यांच्या रंगांची उधळण करणारा तो कलाकार, रचनाकार बनला, पालनकर्ता भगवान विष्णू, बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचं संगोपनही मातेला खूप महत्वाचं असतं. असाच हे जगद्पालक श्री हरीरूप आईच्या मायेनी भक्तांच्या दुखांवर, अडचणीवर हळुवार फुंकर घालतात, आणि सृष्टीचा पुनर्रचेता शिवा मानले आहे. आणि श्री दत्तगुरू हे साक्षात ब्रम्हा, विष्णू , महेश ह्याचा एकस्वरूप आहे.
- गोमाता : कामधेनु (गोमाता) हे धरणी माता आणि धर्म अश्या रुपात नम्रतेनी दत्तागुरुंजवळ उभी आहे.
- चार श्वान : चार वेदांची गाथा सांगणारे चार श्वान सदैव गुरुचरणी दिसतात.१. रीग्वेद २.यजुर्वेद ३.सामवेद ४.अथर्ववेद.
- शंख : शंख नाद ब्रम्ह-तत्त्वात विलीन करणारा आहे.
- डमरू : डमरूनाद हा आपल्या भूतकाळातल्या चूकातून जागं करणारा आहे.
- जपाची माळ : भक्तीचा मार्ग दाखवणारी जपाची माळ.
- त्रिशूल : श्री दत्तागुरूंच्या हातामधील त्रिशूल हे माणसाच्या तीन गुणांचे दर्शन घडवते १.तमास, २.राजस, ३सत्व. पापांचा, वासनेचा, वाईटाचा चेंदामेंदा करणारे हे त्रिशूल आहे.
- चक्र : चक्र काळाची मर्यादा दर्शवते.काळाची मर्यादा हि त्या ईश्वराच्या हाती आहे ह्याचे प्रतिक म्हणून ते चक्र आहे.
- भस्म आणि खांद्याची झोळी वैराग्यचा प्रतिक म्हणजेच आत्म्याच्या पवित्रतेच दर्शन घडवते.
- कमंडलू : कमंडलू हे भिक्षा पात्र आपल्याला दान करायला शिकवतं.भोजन, धन, धान्य अथवा समोरच्या व्यक्तीला निर्मल भावनेने केलेली मदत हीच त्या कमंडलूची खरी शिकवण आहे.
श्री गुरुदेव दत्त ...!!!