Jun 16
३. आकाश :: अचल, अविनाशी
आकाश स्थिर, अचल आणि अविनाशी गुणांनी युक्त आहे. राजाचा महाल असो अथवा गरीबाची झोपडी आकाश त्याचे पांघरूण सर्वांवर पांघरते. तिथे लहान मोठा हा भेदभाव नाही. आकाश सर्वव्यापी आहे.निश्चल आहे. निर्विकार आहे. त्याच प्रमाणे आत्मा हा सर्वव्यापी आहे.अविनाशी आहे. जसे आकाश ढगांनी व्यापलेले असले तरी आकाशाचे सतंत अस्तित्व टिकून आहे त्याच प्रमाणे शरीर आवरणामध्ये आत्मा झाकलेला जरी असला तरी कोणत्याही स्थितीचा चांगल्या - वाईट परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा त्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.
श्री गुरुदेव दत्त...!!!