Jun 16
५. अग्नी :: पवित्रता
अग्नी, अतिशय पवित्र अशी अग्नी तिच्या मध्ये सर्व चांगले - वाईट सामावून घेते. तिच्या तेजाने सर्व मळभ नाहीसे करते. कोणताही दुजाभाव तिच्यामध्ये नाही. आणि आपल्या तेजाचा तिला गर्व नाही. राखेखाली दुमसत राहून आपल्या तेजाला राखेची किनार ती जोडते. आणि एक महत्वाचा गुण म्हणजे सर्वांना उब प्रदान करते. तेव्हा अवधूत म्हणतात कि त्यांच्या पाचव्या गुरु कडून त्यांनी हि शिकवण घेतली कि मनुष्याने अग्नी प्रमाणे तप करून ज्ञानाने तेजस्वी होणे गरजेचे आहे. अग्नीची पवित्रता बाळगून सर्वांसमवेत समान आचरण ठेवावे. आपल्या कुठल्याही कृत्याला अहंकाराची झाल लागू ना देता आपल्या आत्म्याचे तेज जपावे.
श्री गुरुदेव दत्त...!!!