Jun 17

२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त

22.Guru :: Arrow-maker

शरकर्ता म्हणजे बाण तयार करणारा कारागीर. एक दिवस अवधूतांना एक अपूर्व अनुभव आला, एक साधा बाण तयार करणारा कारागीर आपल्या कामामध्ये इतका गर्क होता कि त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा पूर्ण विसर पडला. तो आपले काम पूर्ण एकाग्र चित्ताने करत बसला होता. त्या शरकर्त्याच्या झोपडी शेजारून त्या नगरीच्या राजाची राजस्वारी पूर्ण जल्लोषात, वाजत-गाजत, सरंजामासहित गेली. परंतु त्या कोणत्याच गोष्टीचा त्या कारागीरावर काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा त्या राजाचा सेवक खास त्या शरकर्त्या जवळ आला आणि त्याला विचारले कि, "ह्या वाटेने राजेसाहेबांची स्वारी जाऊन आपण आपले कार्य करीत बसलात, का आपल्याला ह्याची जाणीव झाली नाही?" तेव्हा तेवढ्याच नम्रपणे त्या कारागिराने उत्तर दिले, "महाशय मी माझ्या कर्मामध्ये गर्क असल्या कारणाने मला कसलेच अवलोकन झाले नाही, त्याबद्दल क्षमा असावी." ह्यावरून योगी पुरुषाने एकाग्रता आणि बाळगून ईश्वर चिंतन करावे. परमेश्वर स्वरूपात विलीन होऊन जावे. हाच मार्ग योग्याला मुक्ती प्राप्त करवून देऊ शकतो आणि सर्व कष्टातून सोडवू शकतो.

श्री गुरुदेव दत्त...!!!

 

Date: 17 Jun 2012

Start Jap Online