Oct 23

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


भक्त अतिप्रियसात । दिवाळीच्या सणानिमित्त । न्यायागुरुसीगृहाप्रत । प्रार्थितीं सप्तग्रामवासी ॥१॥
गुरु तोषवाया तयां । सातरुपें धरोनियां । जाती सातांच्या आलया । राहूनियां तया ग्रामीं ॥२॥
तों विस्मित होऊनी पुढती । एकामेकां झगडती । माझे घरीं गुरुमूर्ति । करिती दिपावळी असे ॥३॥
ग्रामलोक मिथ्या म्हणती । येथेंची होती गुरुमूर्ति । दिल्ही खूण सर्व दाविती । गुरु म्हणती सर्व सत्य ॥४॥
होसी केवळ परब्रह्म । असें स्तविंती ते सप्रेम । तयां भक्तां गुरुत्तम । देती धाम अलभ्य जें ॥५॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे दीपावल्युत्सववर्णनं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 22

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


विशद तत्कवितारीती । नृकेसरी तो नरस्तुती । मानुनि निंदी, त्याचे चित्तीं । गुरुमूर्ति प्रगटली ॥१॥
लिंग पिण्डिवर बैसोन । पंचकवित्व पूजन । गुरु घेती, तें पाहून । तो येऊन प्रार्थी गुरुसी ॥२॥
तूं वांचोनी कांदेवासी । मूर्खपणे नरास्तविसी । असें गुरु पुसे त्यासी । प्रार्थुनि त्यांसी तो हो शिष्य ॥३॥
हें उत्तम कवी दोन । गुरुसी गाती अनुदिन । गुरु प्रसन्न होऊन । उद्धरुन न्हेती तयां ॥४॥
जैं तमः शांती करी रवी । तैं हा भक्ताज्ञान नुरवी । येथ हो शांत दुजा रवी । कीर्ती बरवी दावी लोकीं ॥५॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे कवीश्वरउपदेशो नाम षट्‌त्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 19

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


ऐकें ईश्वर प्रभाव । नंदिनाम एक भूदेव । कुष्ठें व्यापुंनि घे धांव । देवीपाशी तुळजापुरीं ॥१॥
त्या ईश्वरीजा गुरुपाशीं । म्हणें, तो बोलेकां नरापशीं । धाडिसी, मग भोपे यांसीं । सांगून त्यांसी घालविलें ॥२॥
धी पुरःसर नावडता । तो ये भेटे गुरुनाथा । गुरु म्हणे तूं कां आतां । आलास रे नरापाशीं ॥३॥
स्वकीय खूण ओळखून । तो प्रार्थी त्या देव मानून । गुरु मह्णे पापें करुन । कुष्ठें व्यापून गेलासी ॥४॥
अकस्मात् पाप हो दूरी । या संगमीं स्नान तूं करीं । म्हणोनी त्याबरोबरीं । सोमनाथासी धाडिती ॥५॥
तो त्याक्षणीं स्नान करी । अश्वत्था प्रदक्षिणा करीं । मठीये त्या अवसरीं । पाहें शरीरीं गुरु म्हणे ॥६॥
शरीर त्याचे दिव्य झालें । किंचित् जंघेसी राहिलें । पुसे कुष्ठ हें कां राहिलें । गुरुबोले विकल्पानें ॥७॥
त्वांजीमनुष्यधी धरिली । तीच तूज आड आली । माझी स्तुती करीं भली, म्हणेतोलिखितही नेणे ॥८॥
विभूती मग जिव्हेवर । टाकूनी, गुरु म्हणे स्तोत्र । करीं, मग तो होयी धीर । करी स्तोत्र श्रीगुरुचें ॥९॥
आत्मा तो तूं सर्वाधीश । शुद्ध बुद्ध नित्य त्रीश । तुला नेणुनि कर्मपाशें । बद्ध होती जीव अज्ञाने ॥१०॥
ते अहंकारें त्रिविध । पापें, घेती योनी विविध । समपापपुण्यें त्रिविध । नर होती रक्तरेतें ॥११॥
गर्भी महाकष्ट भोगी । सोडवाया प्रार्थी विरागी । उपजतां वेगीं । पुढें भोगी होउनि मरे ॥१२॥
त्वद्वीक्षणा विना कैसा । मोक्षा जाईल हा पिसा । तूंची कृपा करी ऐसा । प्रार्थीमानसां स्थिरावून ॥१३॥
गेलें राहिलेलें कुष्ठ । जहाला तो गुरुप्रेष्ठ । कविता करी कविश्रेष्ठ । एकनिष्ठ गुरुपदीं ॥१४॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे ब्राह्मणकुष्ठनिवारणं नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 18

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


सिंहा लोकनें करुन । ऐक पुढील कथन। तंतूक संसारीं असून । भजे गुरुसी याममात्र ॥१॥
तल्लोक श्रीशैलासी । जातां बोलविती त्यासी । तया वदे तो गुरुपाशीं । श्रीशैलेशमल्लिकार्जुन ॥२॥
सर्वत्र हा गुरु एक । पाषाण पाहूं जाती लोक । ते त्या निंदुनी गेले लोक । ये तंतुक गुरुपाशी ॥३॥
तो पाय वंदी त्यासी । गुरु पुसे का जासी । तो तसेंचि सांग त्यासी । चतुर्दशी पुढें आली ॥४॥
नभो मार्गे गुरुतया । नेउनी दाविती श्रीशैल्य । देवा पाहे तो लोक तया । पुसोनी साच न मानीं ॥५॥
लिंगीविलोकी तैं गुरुसी । स्थनमहात्म्यगुरुत्यासी । सांगेपंपापुरींशिवासी । पाहुनि श्वानायेराजत्व ॥६॥
स्त्रीवश्य तो जरि कां शैव । पुसतां स्त्रीला प्राक्स्वभाव । सांगे, राणीपुसेस्वभाव । म्हणे तोकवडींतूंपूर्वी ॥७॥
आलंबिलें मांस पाहून । श्रीशैलाग्रीं धार येऊन। तुजला मारी म्हणून । राणी होवून रमसीं ॥८॥
तूं मी भविष्यड्‌जन्मीं । होवूं राजे, अंती स्वधामी । जावूं म्हणे, तंतुकामीं । क्षेत्रधामी आणिले तुला ॥९॥
जैं वर्त्यग्रीं लागे आग । तैं हो शीघ्र ध्वांतभंग । तमा होतां गुरुसंग । आवृत्तिभंग हों तयाचा ॥१०॥
त्या अव्याग्रागुरुसंगमीं । आणवूनीधाडितीग्रामीं । त्याला भ्रांत म्हणतीग्रामी । मठधामीं आणि भक्तातो ॥११॥
प्रत्यययेयात्रिक येतां । सर्वांला ये निम्रांतता । म्हणेती देव गुरुनाथा । तंतुका भक्ताग्र्यमानिती ॥१२॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे श्रीपर्वतयात्रावर्णनं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Oct 17

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


दे पुरुषार्थ नरांसी । भाद्रशुक्लचतुर्दशीसी चौदा ग्रंथी रक्तसूत्रासी । बांधीं करासी पूजुनी ॥१॥
संतोष मानुनि तो पुसे । व्रत कोणीं हें केलें कसें । गुरु म्हणे द्यूतीं घेतसे । पार्थराज्यदुर्योधन ॥२॥
अभास्त्व पावुनि पांडव । वनीं श्रमतां ये माधव । त्याला द्याया स्ववैभव । सांगे देव अनंतव्रत ॥३॥
त्वदन्यः कोनंत इति । पुसतां म्हणे मीच श्रीपती । ऐकें, सुमंतुकन्या होती । सुशीला ती पूर्वस्त्रीजा ॥४॥
तीहो पत्‍नी कौंडिण्याची । सापत्‍न माता द्वेषी तिची । अन्यत्र न्हे तिला तोची । अनंताची पूजा घेती ॥५॥
देवरवि श्री अनंत । वशीकारभयें अग्नींत । दोरा टाकी मुनी कुपित । दुःखाब्धींत पडे तेव्हां ॥६॥
देव माझेवर रुसला । म्हणून मुनी वनीं गेला । निर्वाणें तो मूर्च्छित पडला । त्या भेटीला श्रीमदनंत ॥७॥
जीवा त्मेशा भिन्नत्वेंशी । स्तुती करितां त्या ऋषीसी । वर दे सवैंश्वरर्येंसीं । तत्पृष्टांशा देयी मोक्ष ॥८॥
त्या अत्युदार अनंत । पुनर्वस्वृक्ष करित । म्हणोनी कृष्ण हें व्रत । करवीत पार्थाकरवीं ॥९॥
दायादादिकां मारुन । सार्वभौम धर्म होऊन । देहासह स्वर्गी जाण । गेला म्हणून करी तूं व्रत ॥१०॥
विप्र हृष्टतर होऊन । गुरुक्त तें हो व्रत करुन । राहे गुरुला सेवून। बंध तोडून मुक्त झाला ॥११॥
तूं अंतःकरणीं जाण । गुरुप्रसादे हो पूर्ण । तुमच्या वंशीं म्हणून । तुझें मन रंगलें हें ॥१२॥
याग योगादिकांवीण । तुम्हां जोडे हेंचि निधान । असे घेती भक्ती करुन । देवा करुन अपुलासा ॥१३॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सारे अनंतव्रतकथनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online