Jul 31

जपनाम :: लेख १. ॐ कार स्वयंभू प्रणवाकार

 

 

 

 

ॐ कार स्वयंभू प्रणवाकार

 

 

अ उ म ह्या तीन अद्याक्षरानी ॐ ह्या प्रणवाची निर्मिती झाली आहे. सनातन धर्मात ॐ साधनेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ॐ म्हणजेच आद्य ध्वनी जो सर्व नैसर्गिक ध्वनी लहरींमधून निर्माण झाला आहे.

सृष्टीनिर्माण प्रक्रियेत ॐ काराच्या लहरींनी परमात्म्याला योगनिद्रेतून बाहेर आणून ह्या जीवसृष्टी सारखी सुंदर रचना सत्यात उतरवण्यास सहाय्य केले. एक अंधकारमय निर्वात पोकळी जी संपूर्ण जलमय होती. सूर्य, तारे, मनुष्य, पशु-पक्षी ह्यांच्या अस्तित्वाचा लवलेशहि नव्हता. आस्तित्व होते ते एक सुवर्णमयी अंड्याचे, त्यालाच हिरण्यगर्भ असे म्हणतात. सृष्टी निर्मितीचा समय समीप आला तसे ह्या हिराण्यगर्भातून शेष अवतरले आणि ह्या जलात त्यांनी स्थान ग्रहण केले. शेषनागावर महाविष्णू निद्राधीस्त होते. सृष्टीनिर्मितीसाठी त्यांची निद्रा भंग करणे आवश्यक होते. अश्या अखंड शांततेत एक असीम ध्वनी घुमत होता, तो प्रणव ध्वनी अधिकाधिक तीव्र होत गेला. हाच प्रथम प्रणव म्हणजेच कार. ह्या कारच्या नादाने भगवान महाविष्णू आपल्या योगनिद्रेतून बाहेर आले आणि सृष्टी आकार घेऊ लागली. ॐ कारमध्ये निर्माण शक्ती आहे.

ऋषी मंडुक ह्यांच्या मंडूकाय उपनिषधात ॐ कराचे महत्व समजते. मंडुकाय उपनिषद सर्वात छोटे असून त्यात फक्त 12 छंद आहेत. मंडूकाय उपनिषदात चेतन स्थितीच्या चार प्रकारांचे वर्णन आहे. ॐ कार म्हणजेच पूर्ण आणि शाश्वत सत्य आहे, ज्याच्यात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सामवलेले आहे. ॐ कार म्हणजे आत्मा, स्वः. ॐ दोन प्राकृतिक गुणांनी युक्त आहे, एक म्हणजे लौकिक आणि दुसरा म्हणजे अनंत. ॐ म्हणजे अ उ म आणि त्याचाच चतुर्थ भाव म्हणजे आमात्र, आपल्याला ऐकू येत नाही परंतु त्याचे अस्तित्व असते. ह्या उपनिषधात नमूद केल्याप्रमाणे जे काही आपण बघतो, ज्याला काही एक विशिष्ट आकार आहे, जे सज्ञात आहे, त्याचा निर्माण ॐ कारातच आहे. म्हणूनच ॐ कारला प्रणव म्हणजेच सर्व मंत्रांचे बीज मानले जाते. त्यामुळे आपण जप करताना किंवा कोणत्याही मंत्राचे पठाण करताना ॐ ने प्रारंभ करतो.

ॐ कार म्हणजे नामहि आहे आणि आकृती रूपातही त्याचे तितकेच महत्व आहे. ॐ कार हा स्वयंभू प्रणव आहे. हा प्रणव आपण स्वतः उच्चारत नसतो तर आपल्या शरीरातून त्याच्या नाद लहरी बाहेर येतात. आपले शरीर म्हणजेच ॐ. ह्या अद्वितीय ध्वनी प्रणवचे ब्रम्हदेवाने तीन भागात विभाजन करून सृष्टीचा निर्माण केला. ते म्हणजे अ उ म आणि चौथे व्यःरीती (लोक*)

  • अ म्हणजे वैश्वनर स्थित, जागृत अवस्था ज्यामध्ये आपण भौतिक सुखाचा विचार करतो.
  • उ म्हणजे तैजस स्थिती, निद्रा अवस्था ज्यामध्ये आपले आंतरिक विचार आणि मन कार्यरत असतात. ह्याला आत्म अनुभव असे म्हणतात
  • म म्हणजे प्रजन स्थिती, स्वप्नंरहित निद्रा म्हणजेच ध्यान. आंतरिक विचारांचे मूळ, सत्य ह्यांचा बोध होतो.
  • चौथी आणि क्लीष्ठ अवस्था म्हणजे तुरीया, अशी स्थिती जिचे वर्णन अशक्य आहे. ॐ कारा नंतरचे आत्मिक समाधान ज्याचे वर्णन आपण शब्दात करू शकत नाही पण त्याची जाणीव होते तसेच हि स्थिती फक्त जाणवते.

 

ॐ काराचे फायदे :

  1. भौतिक विचारांना, संकल्पनांना दूर लोटून चित्त एकाग्र करण्यास मदत होते.
  2. मानसिक अशांतता, चंचलता, भीती, संशय दूर करण्यासाठी मदद होते.
  3. आत्मबोध होण्यासाठी मदद होते.
  4. ॐ काराने स्वरयंत्राला ताकद मिळते आणि मौखिक स्वस्थ लाभते.

 

ॐ कार साधने दरम्यान घ्यावयाची काळजी :

ॐ कार हा स्वयंभू नाद असल्याने तो अतिशय प्रभावशाली आहे. ॐ कार साधना करण्यापूर्वी किंवा करताना काही नियम अवश्य पाळावेत.

  1.  ॐ कार साधना गुरुसानिध्यात आणि गुरु आदेशानेच करावी.
  2.  ॐ कार साधनेत उचारणातील फरक लक्षात घेयून ॐ म्हणावे.
  3. नुसत्या ॐ कराची साधना स्त्रियांनी विशेषतः गर्भवती स्त्रियांनी करू नये कारण ॐ कार साधनेत शरीरात उष्णतेचा संचार जास्त होत असतो. ॐ काराने उदरात स्थित मणिपूर चक्रात उष्णता एकत्रित केली जाते. त्यामुळे स्त्रियांनी ॐ कार साधनेसाठी गुरुआज्ञेचेच पालन करावे.

उपोरोक्त लेख केवळ ॐ कारा संदर्भात माहिती देण्यासाठी प्रस्तुत आहे. वाचकांनी साधना करण्यापूर्वी ॐ साधनेविषयी आपल्या गुरूंकडून सविस्तर माहिती घ्यावी आणि गुरुआज्ञेविना ॐ साधना करू नये. 

 

 

Related Articles :

 

 

 

श्री गुरुदेव दत्त ...!!!

Date: 31 Jul 2014

Start Jap Online